पहिल्याच प्रयत्नात बेळगावची मुलगी भारतीय वनसेवेत...

Priyanka Tarle was selected for the Indian Forest Service belgum marathi news
Priyanka Tarle was selected for the Indian Forest Service belgum marathi news
Updated on

बेळगाव - भारतीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत आंबेवाडीच्या (ता. बेळगाव) मुलीने झेंडा रोवला आहे. कमी वयात व पहिल्याच प्रयत्नात ही किमया साधणारी ती बेळगावची पहिलीच मुलगी ठरली. तिची भारतीय वनसेवेसाठी (इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेस) निवड झाली असून, १ डिसेंबरपासून ती हिमाचल प्रदेशात प्रशिक्षण घेत आहे. प्रियांका रवींद्र तरळे असे तिचे नाव आहे. प्रियांकाने यापूर्वी केपीएससी परीक्षेत यश संपादन केले होते. पण, उच्चाधिकारी होण्याची इच्छा असल्याने तिने यूपीएससी 
परीक्षा दिली.

कमी वयात अन्‌ पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण

प्रियांका तरळेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंटमध्ये झाले. दहावीत तिने ९८ टक्के गुण मिळवून जिल्ह्यात प्रथम व राज्यात तिसरा क्रमांक पटकावला होता. आरएलएस महाविद्यालयात तिचे बारावीपर्यंत शिक्षण झाले. बारावी विज्ञानमध्ये तिने ९९.५ टक्के गुण मिळविले. त्यानंतर तिने बीई पदवी विशेष प्राविण्यासह मिळवली. बंगळूरमधील संख्या लॅबमध्ये तिने चार महिने काम केले. 
पण, तिला प्रशासकीय सेवेत अधिक रस होता. त्यामुळे, नोकरी सोडून तिने केपीएससी व युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली होती. केपीएससी परीक्षाही ती पहिल्याच प्रयत्नात पार केली. पण, भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याची इच्छा असल्याने तिने युपीएससीची तयारी सुरु केली. अथक परिश्रम घेऊन ती पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण झाली. तिची भारतीय वनसेवेत निवड झाली आहे. ती १ डिसेंबरपासून हिमाचल प्रदेशात प्रशिक्षण घेत आहे. हिंडलगा शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र तरळे हे प्रियांकाचे वडील आहेत. वडील व शिक्षकांचे मार्गदर्शन तसेच कठोर मेहनत केल्यामुळेच हे यश संपादन केल्याचे तिने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Red Bull Breaks the Ritual Barrier as Salgare Preserves 202-Year Bendur Tradition
Sangli Anti Corruption Bureau trap
Latest Koyna Dam storage report
MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com